जिल्हा रुग्णालयात प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:26+5:302021-09-23T04:39:26+5:30

शस्त्रक्रियेसाठी तब्बल दाेन तास ४० मिनिट एवढा कालावधी लागला. शस्त्रक्रियेसाठी व्यवस्था अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, डॉ. प्रशांत ...

Successful surgery on oral cancer for the first time at the district hospital | जिल्हा रुग्णालयात प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

शस्त्रक्रियेसाठी तब्बल दाेन तास ४० मिनिट एवढा कालावधी लागला. शस्त्रक्रियेसाठी व्यवस्था अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, डॉ. प्रशांत पाटील (कान-नाक-घसा तज्ज्ञ), डॉ. सुशील चव्हाण,(नाक-कान-घसा तज्ज्ञ) यांनी उपस्थित राहून केली. तसेच फिजिशियन डॉ वासेकर, भूलतज्ज्ञ डॉ़ उंबरकर, डॉ़ मनीषा रेड्डी, मुख व दंत रोग तज्ज्ञ डॉ. अनुजा पाटील, डॉ. सोनाली मुंडे, डॉ. मेटकर, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वयक डॉ़ लता भोसले आणि स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस, बुलडाणा जिल्ह्यातील प्रथमच होऊ घातलेल्या शस्त्रक्रियेदम्यान संपूर्ण उपस्थिती राहून मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालयातील दंत विभागाचे डॉ. मेटकर आणि डॉ सोनाली मुंडे यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी रोगनिदान व शस्त्रक्रियेपर्यंत सर्व बाबतीत पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य केले. रुग्णासाठी कृत्रिम टाळू बनविण्यासाठी तंत्रज्ञ ज्ञानेश्वर पवार यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ओपीडी ३३ येथील समुपदेशक लक्ष्मण सरकटे व सामाजिक कार्यकर्ता अर्चना आरख यांनी रुग्णाला तंबाखू मुक्त होण्यासाठी पाठपुरावा केला.

बिडी किंवा सिगारेटमुळे हाेताे मुख व मानेचा कर्कराेग

टाळूचा कर्करोग बिडी किंवा सिगारेटच्या व्यसनामुळे होतो. मुख व मानेचे कर्करोग तज्ज्ञ डॉ राम पाटील हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून वरवंड, ता. जि. बुलडाणा येथील मूळ रहिवासी आहेत. डॉ राम पाटील यांनी आत्तापर्यंत मुख व मानेचे कर्करोगाचे २१०० च्या अधिक शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने पार पडल्या आहेत. सध्या डॉ. पाटील पुणे येथे कर्करोग विभागाचे प्रमुख आहेत.

Web Title: Successful surgery on oral cancer for the first time at the district hospital