बायोगॅससाठी अनुदान पुरेना
By Admin | Updated: February 17, 2015 01:28 IST2015-02-17T01:28:10+5:302015-02-17T01:28:10+5:30
अनुदान नऊ हजारांचे ; खर्च मात्र ३५ हजारांचा.
बायोगॅससाठी अनुदान पुरेना
बुलडाणा : पर्यावरणपूरक असलेल्या बायोगॅसचा गावागावात वापर वाढावा, यासाठी शासनाकडून बायोगॅस बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते; मात्र प्रत्येक लाभार्थ्यांना ३५ हजार रुपये खर्च येत असताना शासनाकडून मिळणारे नऊ हजारांचे अनुदान बांधकामासाठी तोकडे आहे. शासनाने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरावर भर देण्याचे धोरण आखले आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना आखण्यात आली. यासाठी केंद्राकडून राज्याला तीन टप्प्यात अनुदान वाटप केले जाते. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या कृषी विभागाकडून लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. ज्या शेतकर्याकडे जनावर आणि मुबलक जागा आहे. अशांचा ग्रामसेवकांडून सर्व्हे करून त्यांची निवड या योजनेसाठी केली जाते; मात्र या बांधकामासाठी एकूण ३५ हजार रुपये खर्च येतो. या तुलनेत शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे ठरते.
मात्र बुलडाणा जिल्हापरिषद अंतर्गत कृषी विभागाचे मोहीम आधिकारी आंनद चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बायोगॅस योजना जिल्ह्यात पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या सहकार्यातून प्रभावीपणे राबविण्यात येत इअसल्याचे सांगीतले. जिल्हय़ात १00 बायोगॅस संयंत्र उभाण्याचे उद्दिष्ट असून, यासाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. शिवाय बर्याच शेतकर्यांना बायोगॅसच्या वापरातून इतरांसाठी आदर्श निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.