शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ््यातील प्रकल्पांचा चौकशी अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:17 IST

बुलडाणा: सिंचन घोटाळ््यातील जिगावसह बुलडाणा जिल्ह्यातील संशयाच्या भोवर्यात असलेल्या चार प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांची चौकशी पूर्णत्वास गेली असून त्याचा अंतिम अहवाल हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

- नीलेश जोशी बुलडाणा: सिंचन घोटाळ््यातील जिगावसह बुलडाणा जिल्ह्यातील संशयाच्या भोवर्यात असलेल्या चार प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांची चौकशी पूर्णत्वास गेली असून त्याचा अंतिम अहवाल हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्पाचीही चौकशी पूर्ण झाली असून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे फायनलस्टेजसाठी परवानगी मागितली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पासह पेनटाकळी, खडकपूर्णा, लोणार तालुक्यातील हिरडव आणि नांदुरा तालुक्यातील लोणवडी हे प्रकल्पही संशयाच्या भोवर्यात होते. जिगावची गेल्या पाच वर्षापासून चौकशी सुरू होती तर अन्य चारही प्रकल्पाची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक दर्जाच्या दोन अधिकार्यांकडून गेल्या दहा महिन्यापूर्वी चौकशी सुरू करण्यात आली होती.यातील खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पासंदर्भातील टेंडरची संख्या मोठी असल्याने मर्यादीत स्वरुपात उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पांच्या कामात झालेल्या कथितस्तरावरील गैरव्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, नांदुरा तालुक्यातील लोणवडी आणि लोणार तालुक्यातील हिरडव प्रकल्पांमधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्णत्वास गेली असून त्याचा अहवाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे मध्यंतरी पाठविण्यात आला आहे. महासंचालकांकडून या अहवालातील त्रुटी स्पष्ट करून काही सुचना दिल्या जाणयाची शक्यता असून प्रसंगी तो अहवालही कामय केला जाऊ शकतो. त्यानुषंगाने अद्याप वरिष्ठ पातळीवरून सुचना आलेल्या नाहीत, असे सुत्रांनी सांगितले.खडकपूर्णाची व्याप्ती मोठी४संशयाच्या भोवर्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचीही व्याप्ती मोठी असून ४१७ टेंडरपैकी २५ कोटी रुपयांवरील सहा टेंडरबाबत चौकशी सुरू असून संबंधित विभागाकडून पैकी दोन टेंडरची कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रकल्पाची व्याप्ती मोठी असल्याने या चौकशीस वेळ लागण्याची शक्यता आहे. अशीच काहीशी स्थिती पेनटाकळी प्रकल्पाबाबत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांची सध्या चौकशी सुरू असून जुलै २०१९ मध्ये या प्रकरणी न्यायालयात सुनावणी आहे. या प्रकल्पांच्या कामाच्या निविदा, इतर गैरव्यवहाराबाबत कागदपत्रे गोळा करणे सोबतच निविदा किती जणांनी दाखल केली होती, काम कोणाला मिळाले, मुळ प्रशासकीय मान्यता, सुप्रमा, कामातील अनियमितता याची चौकशी केल्या जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प