साडेपाच लाखाचा अग्रीम जमा करा- कृउबास सचिवांची सभापतींना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:15 PM2019-09-10T15:15:53+5:302019-09-10T15:16:22+5:30

कृउबासच्या सचिवांनी सभापतींना सोमवारी एक नोटीस जारी केली आहे.

Submit five and a half lakhs advance - Notice to the Chairperson | साडेपाच लाखाचा अग्रीम जमा करा- कृउबास सचिवांची सभापतींना नोटीस

साडेपाच लाखाचा अग्रीम जमा करा- कृउबास सचिवांची सभापतींना नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बाजार समितीतून उचल केलेल्या साडेपाच लाख रुपयांचा अग्रीम तात्काळ जमा करण्याच्या सूचना सचिवांनी सभापतींना केल्या आहेत. यासंदर्भात कृउबासच्या सचिवांनी सभापतींना सोमवारी एक नोटीस जारी केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच खळबळ उडाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष रामराव टाले यांनी बाजार समितीच्या रेकॉर्ड नुसार साडेपाच लाखाचा अग्रीम उचलला आहे. १४ मे २०१८ ते ०४ मे २०१९ या कालावधीत सभापतींनी वेळोवेळी तब्बल १२ वेळा हा अग्रीम उचलला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेकॉर्डनुसार ही रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळे सदर रक्कम तीन दिवसांच्या आत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जमा करण्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीच्यांनी सभापतींना केल्या आहेत.
यासंदर्भात सभापती संतोष टाले यांना सोमवारी एक नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वीच खामगाव बाजार समितीत प्रशासक नेमण्यात आला आहे.


खामगाव बाजार समिती प्रशासनाकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही पत्र मला मिळाले नाही. राजकीय सुडबुद्धीने व दबावापोटी सचिवाने हे पत्र काढले असावे. उचललेल्या अग्रीमाची रक्कम ही न्यायालयीन प्रकरणे, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी यासाठी उचलण्यात आली आहेत. त्याचे सर्व रेकॉर्ड बाजार समितीत आहे. 
- संतोष टाले
माजी सभापती,बाजार समिती खामगाव

Web Title: Submit five and a half lakhs advance - Notice to the Chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.