शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आहाराऐवजी मिळणार थेट तांदूळ व दाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:46 IST

पहिली ते पाचवी पर्यंत ९ हजार ५१४ तर सहावी ते आठवी पर्यंत ५ हजार ३३१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे तांदूळ, डाळ, कडधान्य समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपुर : कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण संचालकांनी ३० मार्च रोजी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराऐवजी थेट धान्य वाटप करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा परिषदेने ३० मार्च रोजी या संदभार्तील आदेश पंचायत समिती व प्रत्येक शाळेत दिले आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ७ ते ११ दरम्यान पोषण आहारातील तांदूळ व दाळ वाटपासाठी तालुक्यातील सर्व शाळांवर शालेय शिक्षण समितीची पुर्वनियोजित बैठक पार पडली. शिक्षण विभागाच्या या आदेशाने तालुक्यातील १२१ शाळांमधील १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. दि. १ ते ३ एप्रिल पर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेत शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांना बोलावून वाटप करण्यात येणार आहे. २५ विद्यार्थ्यांना १ मिटर अंतरावर उभे करून पोषण आहाराचे धान्य वाटप करण्यात येणार आहे. संग्रामपूर तालुक्यात पहिली ते पाचवी पर्यंत ९ हजार ५१४ तर सहावी ते आठवी पर्यंत ५ हजार ३३१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे तांदूळ, डाळ, कडधान्य समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणू संसर्गा पादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू केली. त्यामुळे आदिवासी गोरगरीब शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. संचारबंदी दरम्यान शाळा बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शालेय पोषण आहाराचा मुद्दाही ऐरणीवर आला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचा पालकांनी स्वागत केले आहे. शाळेमधून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे धान्य वाटपाची प्रक्रिया आज बुधवारी रोजीपासून सुरू होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरSchoolशाळाStudentविद्यार्थी