विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ

By Admin | Updated: October 15, 2014 00:42 IST2014-10-14T23:20:17+5:302014-10-15T00:42:17+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील गावागावांत जनजागृती.

Students take oath to vote | विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ

विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ

बुलडाणा : विधानसभेसाठी बुधवारी होऊ घातलेल्या मतदानासाठी मी स्वत: मतदान करेल तसेच घरातील आणि गावातील सर्व नागरिकांचे मतदान करून घेईल, अशी शपथ मोताळा येथील शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज घेतली.
मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यालयात झालेल्या मतदार जागृती अभियानाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मास्कर होत्या. यावेळी भारतीय राज्यघटनेने बहाल केलेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत प्रा. जे. जे. जाधव यांनी माहिती दिली. मतदान हा केवळ मूलभूत अधिकार नाही, तर ते आपले कर्तव्य आहे. भारतीय लोकशाही प्रगल्भ असून, बहुमतावर आधारलेली आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेला महत्त्व आहे. ही प्रक्रिया नि:पक्ष व निर्भीडपणे पार पाडण्याचे आवाहन प्रा. बोबडे, प्रा. विरकर, प्रा. भरत जाधव यांनी केले.

Web Title: Students take oath to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.