महिला सरपंचांनी दिले स्वखर्चातुन विद्यार्थ्याना दप्तर
By Ram.deshpande | Updated: July 26, 2017 20:08 IST2017-07-26T20:08:08+5:302017-07-26T20:08:20+5:30

महिला सरपंचांनी दिले स्वखर्चातुन विद्यार्थ्याना दप्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा:- तालुक्यतील सिंदखेड हे 2500 लोकवस्ती असलेले गांव या गांवात सरपंच विमल अर्जुन कदम यांची सामजिक बांधली जपुन गावातील मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे स्वखर्चाने 60 ते 70 मुलांना स्कूल बॅग वाटप करून शिक्षणाबद्दल आपली आपुलकी दाखवली आहे.
त्यांनी वाटप केलेल्या या बॅग वर ' बेटी बचाओ बेटी पढाव' आणि' स्वछ भारत मिशन' चा लोगो टाकून सामाजिक शैक्षणिक असा संदेश कदम यांनी दिला. यावेळी सरपंच विमलताई अर्जुन कदम , उपसरपंच ज्योती दिलीप मोरे, प्रकाश दिनकर गडाख शा. व्य. समिती अध्यक्ष, उषाबाई संतोष माळेकर शा. व्य. उपअध्यक्ष,ज्ञानदेव गडाख तंटामुक्त अध्यक्ष, आरती प्रमोद चव्हाण पोलीस पाटील, मधुकर लवांडे, भाऊराव खडके, रामदास थाटे, मायाबाई वाघ, ग. भा. सुशीला अलोने, वंदना गडाख, शुभांगी मोरे अंगणवाडी, ग. भा.प्रमिला खडके अंगणवाडी, किशोर गडाख ग्रा.प. सदस्य, सचिन रोही, चांदणे, देशपांडे, चव्हाण, गोपाल गडाख माजी केंद्र प्रमुख, परशुराम पवार, राजू भवर, भागवत खराटे, मधुकर थाटे, शामराव खराटे, ज्ञानेश्वर खराटे ग्रा. प. सदस्य, रामदास दांडगे, वैशाली आनंता इंगळे, पद्माकर अलोने उपस्थित होते.