मिल्ट्री स्कूलमधील स्फोटात विद्यार्थी ठार
By Admin | Updated: March 30, 2017 13:54 IST2017-03-30T13:54:20+5:302017-03-30T13:54:20+5:30
दोन दिवसाच्या उपचारानंतर जखमी विद्यार्थ्याचा बुधवारीरात्री मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिल्ट्री स्कूलमधील स्फोटात विद्यार्थी ठार
दोन दिवसांपूर्वी झाला स्फोट
बुलडाणा : देऊळघाट येथील राजीव गांधी मिल्ट्री स्कूलमध्ये दोन
दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात जनूना येथील विद्यार्थी निवृत्ती
शालीग्राम चंडोल जखमी झाला होता. सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने
जनूना येथील नागरिकांनी गुरूवारी सकाळी स्कूलमध्ये दोषींवर कारवाई
करण्याची मागणी केली.
स्फोटात जखमी झाल्यानंतर निवृत्ती चंडोलला तत्काळ उपचारासाठी मुंबई येथे
हलविण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर जखमी विद्यार्थ्याचा बुधवारी
रात्री मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह
गुरूवारी सकाळी राजीव गांधी मिल्ट्री स्कूलमध्ये आणण्यात आला. यावेळी
निवृत्तीच्या पालकांनी व गावातील नागरिकांनी आक्रोश करीत दोषींवर कारवाई
करण्याची मागणी केली. शाळेमध्ये पेन्सील सेलचा स्फोट झाल्याचे पोलिसांनी
सांगितले. या स्फोट प्रकरणाची मिल्ट्री स्कूलच्यावतीने कुठेही वाच्यता
करण्यात आली नाही.