विद्यार्थ्यांनी दिला ‘बेटी बचाओ’चा नारा
By Admin | Updated: October 12, 2015 01:26 IST2015-10-12T01:26:54+5:302015-10-12T01:26:54+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ‘बेटी बचाओ’ रॅलीत विद्यार्थ्यांनींचा उस्फूर्त सहभाग.

विद्यार्थ्यांनी दिला ‘बेटी बचाओ’चा नारा
बुलडाणा: आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून ११ ऑक्टोबर रोजी ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित ह्यबेटी बचाओह्ण रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. 'बेटी बचाओह्णच्या नार्याने अवघे शहर दुमदुमले होते. या रॅलीला आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर आदी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. जिजामाता प्रेक्षागार मैदानापासून डीएसडी, चैतन्यवडी, महाराणा प्रताप चौक, बाल शिवाजी कॉन्व्हेट, एडेड हायस्कूल, तहसील चौक मार्गे जिजामाता प्रेक्षागार मैदानावर पोहोचली. रॅलीचा समारोप जिजामाता प्रेक्षागार मैदानावर झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी प्रास्ताविक कर ताना ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण मोहिमेचे महत्त्व सांगितले. तसेच रॅलीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी स्त्नी-पुरुष लिंग गुणोत्तरमध्ये प्रती हजार पुरुषामागे स्त्नियांच्या कमी असलेल्या संख्येवर चिंता व्यक्त केली. याबाबत मोताळा तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. आमदार सपकाळ यांनी ह्यबेटी बचाओह्णचा नारा समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत प्रत्येक बेटीने तिच्यामधील शक्ती ओळखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पत्नकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प अध्यक्ष अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, महिला व बालकल्याण सभा पती आशाताई झोरे, समाज कल्याण सभापती गणेश बस्सी, बांधकाम सभापती अंकुश वाघ, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, जि.प. सदस्य सुमीत सरदार, अप्पर जिल्हा पोलीस श्वेता खेडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, उप मुकाअ चंदन, डीआरडीएचे प्रकल्पसंचालक अनुप शेंगुलवार, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, डॉ. गजानन पडघान, डॉ. वैशाली पडघान, उल्का कुरुंदकर, चित्नांगण खंडारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव तसेच लोकप्र ि तनिधी, नागरिक, विद्यार्थी आदींची मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती होती.
मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नाटिका
जिजामाता प्रेक्षागारात झालेल्या कार्यक्रमात अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे..' हे ह्रदयस्पश्री गीत सादर केले. अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांनी ह्यलेक वाचवाह्ण या आशयाची नाटिका सादर केली. शासकीय परिचारिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नाटिका सादर केली. यावेळी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या चित्नांचे प्रदर्शन लक्षवेधी होते.