ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना येताहेत अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:27+5:302021-09-24T04:40:27+5:30

ऑनलाईन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नेटवर्क जाणे, मोबाईलमधील इतर अडचणी येणे, मधेच फोन जर आला ...

Students face difficulties in online classes | ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना येताहेत अडचणी

ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना येताहेत अडचणी

ऑनलाईन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नेटवर्क जाणे, मोबाईलमधील इतर अडचणी येणे, मधेच फोन जर आला असेल तर विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू असताना व्यत्यय येतो. या ना त्या अशा अनेक अडचणींना विद्यार्थ्यांसह पालकांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे नीट २०२२ रिपीटर विद्यार्थी हे जवळपास अठरा वर्षांवरील असून, या सर्वांनीच दोन्ही डोस घेतलेले आहेत. शासनाने ज्याप्रमाणे लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत, त्याचप्रमाणे रिपीटर व नियमित विद्यार्थ्यांना ही दोन्ही डोस घेतले असेल तर त्यांचे ऑफलाइन क्लासेस सुरू करावेत अशी मागणी होत आहे.

ऑफलाइन क्लासेस सुरू करा : शेळके

ऑनलाईन क्लासेसमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. नीट २०२० चे रिपीटर व रेग्युलर विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतले असल्याने त्यांचे नियमित क्लासेस सुरू करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांचे ऑफलाइन क्लासेस सुरू करावे, अशी मागणी डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केली आहे.

Web Title: Students face difficulties in online classes