विद्यार्थी, प्राचार्यांमधील वाद पोहोचला शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:31 IST2017-08-01T00:26:50+5:302017-08-01T00:31:26+5:30

Students and teachers got dispute between Shigela! | विद्यार्थी, प्राचार्यांमधील वाद पोहोचला शिगेला!

विद्यार्थी, प्राचार्यांमधील वाद पोहोचला शिगेला!

ठळक मुद्देशेगाव आयटीआयमधील प्रकारपरीक्षा तोंडावर असताना, महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नाहीनिवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना हाकलून देण्यात आले



लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला प्राचार्य आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद सोमवारी चांगलाच उफाळून आला. दरम्यान, निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना हाकलून देण्यात आले. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वातावरण चांगलेच तापले होते.
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये परीक्षा तोंडावर असताना, महत्त्वाच्या विषयासाठी सुरुवातीपासून शिक्षक नाही. यामुळे या वर्गातील ४८ विद्यार्थ्यांचा या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्राचार्य राजश्री पाटील यांना सांगितले; मात्र प्राचार्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. शिवाय विद्यार्थ्यांना दमदाटी केल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. दुसरीकडे येथील शिल्प निदेशक ऋषिकेश गडम यांसह काही शिक्षकांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. या सर्व प्रकाराबाबत सोमवारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पाटील यांनी निवेदन हिसकावत सत्य प्रतिवर स्वाक्षरी देण्यास नकार दिला. सोबतच विद्यार्थी आणि शिक्षकांना कॅबिनबाहेर हाकलून देण्यात आले. तसेच बाहेर निघणार नसाल तर पोलिसांत तक्रार देण्याची धमकीही दिल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. दरम्यान, प्रसिद्धी माध्यमांना बोलावून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्य पाटील यांच्याकडून संस्थेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर होणाºया अन्यायाबाबत माहिती दिली, तर प्राचार्य पाटील यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करीत कारवाई न झाल्यास विद्यार्थी परीक्षेवर बहिष्कार घालतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्राचार्यांनी मागितले पोलीस संरक्षण
विद्यार्थी परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पाटील यांनी परीक्षेच्या काळात पोलीस बंदोबस्त मिळावा, असे पत्र शहर पो.स्टे.ला दिले आहे.

Web Title: Students and teachers got dispute between Shigela!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.