विद्यार्थी अपहरण नाट्यावर पडदा

By Admin | Updated: October 9, 2015 01:55 IST2015-10-09T01:55:05+5:302015-10-09T01:55:05+5:30

१५ तासात लावला छडा.

Students abduction screen | विद्यार्थी अपहरण नाट्यावर पडदा

विद्यार्थी अपहरण नाट्यावर पडदा

जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथील बी.एस. पटेल विद्यालयात इयत्ता १0 वी मध्ये शिकणारा विशाल गजानन चंदनसे (वय १७) या विद्यार्थ्यांंचे ७ ऑक्टोबर रोजी अपहरण झाल्याने संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली होती; परंतु पोलिसांनी आपले चक्रे वेगाने फिरवून तब्बल १५ तासात या प्रकरणाचा उलगडा करून अपहरण झालेल्या मुलाला आठ ऑक्टोबरला ताब्यात घेतले. विशाल हा खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील रहिवासी असून, तो पिंपळगाव काळे येथे मामाकडे शिक्षणासाठी राहत होता. ७ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. घरून डबा घेऊन गेला आणि उशिरापर्यंंत घरी आला नाही म्हणून त्याचा भ्रमणध्वनी लावण्याचा प्रयत्न नातेवाइकांनी केला. काही वेळानंतर त्याने महादेव तानकर यांचा फोन उचलला व मला कारमध्ये डांबून कुठेतरी नेत असल्याचे सांगितले. त्यावरून त्याचे मामा अनिल उत्तमराव बहादरे (रा. पिंपळगाव काळे) यांनी जळगाव पोलीस स्टेशनला रात्री तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३६५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात डीवायएसपी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून तीन पथके तयार करून शोधार्थ पाठविले. त्यामध्ये ठाणेदार पाटकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुयडे, एपीआय पवार, गणेश पाटील व स्वत: डीवायएसपी साळुंके यांचा समावेश होता. मोबाइल टॉवर आणि संभाषणावरून विशालच्या झालेल्या कॉलवरून तपास केला असता तो शेगावात असल्याचे कळल्याने मंदिरातील सीसीटिव्ही फुटेजवरून त्याची ओळख पटविण्यात येऊन त्यास ताब्यात घेण्यात आले. ८ ऑक्टोबरला त्याला जळगावला आणण्यात आले. अवघ्या १५ तासात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.

Web Title: Students abduction screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.