शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:48 IST

आॅटोरिक्षा, छोट्या व्हॅनसारख्या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विद्यार्थी वाहतुकीसाठी इतर खासगी वाहनांवर बंदी आहे. मात्र बुलडाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या वाहनांचा वापर होत आहे. एवढेच नव्हे तर आॅटोरिक्षा, छोट्या व्हॅनसारख्या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय कोंबून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा ते घर असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.विद्यार्थ्यांना शाळा ते घर ये-जा करण्यासाठी स्कूल बसला आरटीओ विभागाकडून परवाना देण्यात येतो. यानुसार २२, २४ व ४० अशा विद्यार्थी क्षमतेच्या वाहनांना परवाना देण्यात आला आहे. याआधी ७ विद्यार्थी क्षमता असलेल्या वाहनांना देखील परवाना देण्यात येत होता. मात्र या वाहनासह खासगी वाहनांनी विद्यार्थी वाहतूक करण्यावर शासन निर्णयानुसार बंदी घालण्यात आली आहे. असे असताना जिल्ह्यात सात विद्यार्थी क्षमता असलेल्या छोट्या व्हॅनमध्ये १२ ते १५ विद्यार्थ्यांची वाहतुक केली जात आहे. याबरोबरच आॅटोरिक्षामध्ये तर तीन प्रवाशांची क्षमता असतानाही १० ते १२ विद्यार्थ्यांना अगदी कोंबून बसविल्या जाते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास आता धोकादायक बनला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू, नये यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने अशा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा धोकादायक प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.

पासिंग नसणाऱ्या ३३ स्कुल बसविरोधात कारवाईविद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कूल बसची आरटीओ विभागाकडून पासिंग करणे अनिवार्य असते. मात्र पासिंग न करताच विद्यार्थी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात ३३ स्कूल बसधारकांविरोधात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच बंदी विद्यार्थी वाहतूक करणाºया सुमारे २०० आॅटोरिक्षा वाहनांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परवाना नसताना विद्यार्थी वाहतूक करणाºया खासगी वाहनांवर आरटीओ विभागाची नेहमी नजर असते. नियम न पाळणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येते. तरी देखील असे प्रकार सुरू असल्याने पालकांनी देखील आपल्या पाल्यांना सुरक्षित वाहनानेच शाळेत पाठवावे. याचप्रमाणे शिक्षण विभागाने देखील पुरेशा स्कूल बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.-जयश्री दुतोंडे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थीRto officeआरटीओ ऑफीसSchoolशाळा