विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: February 15, 2016 02:25 IST2016-02-15T02:25:43+5:302016-02-15T02:25:43+5:30

जळगाव जामोद तालुक्यातील घटना; १५ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास.

Student Suicide | विद्यार्थिनीची आत्महत्या

विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगाव जामोद: तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथील १५ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही बाब समोर आली. रोहिणी प्रकाश बैरागी असे आत्महत्या करणार्‍या मुलीचे नाव आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे तिने आत्महत्या केली ही बाब वृत्त लिहिपर्यंंंत स्पष्ट होऊ शकली नाही. याबाबत फिर्यादी मंगेश भरतदास वैभव (वय ४0 रा. पिंपळगाव काळे) यांनी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव पोलिसांनी कलम १७४ जाफौ नुसार र्मग दाखल केला आहे. मृतक रोहिणीने राहत्या घरात अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारी हे करीत आहेत. नेमक्या कोणत्या कारणाने तिने आत्महत्या केली ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही.

Web Title: Student Suicide