लग्नात वाढण्यावरुन एकास काठीने मारहाण

By Admin | Updated: April 27, 2017 00:12 IST2017-04-27T00:12:38+5:302017-04-27T00:12:38+5:30

खामगाव : लग्नात प्वाढण्याचे कारणावरुन वाद झाल्याने तिघांनी एकास काठीने मारहाण करुन हात मोडल्याची घटना तालुक्यातील पळशी येथे घडली.

Struggling with one stick | लग्नात वाढण्यावरुन एकास काठीने मारहाण

लग्नात वाढण्यावरुन एकास काठीने मारहाण

खामगाव तालुक्यातील पळशी येथील घटना

खामगाव : लग्नात प्वाढण्याचे कारणावरुन वाद झाल्याने तिघांनी एकास काठीने मारहाण करुन हात मोडल्याची घटना तालुक्यातील पळशी येथे घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. समाधान रामभाऊ बुंदे (वय ४०) रा.पळशी यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, शनिवारी गावातील एका लग्न सोहळ्यात जेवण वाढण्याचे कारणावरुन गावातीलच आनंदा उकर्डा साळोकार, गणेश सदाशिव सिरकर, आशिष बंडू ठोसरे यांनी वाद घालत शिविगाळ केली. यानंतर सायंकाळी घरी जात असताना याच तिघांनी रस्त्यामध्ये अडवून पुन्हा वाद उकरुन काढत काठीने मारहाण करुन जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत उजवा हात फ्रक्चर झाला. या फिर्यादीवरुन खामगाव ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुध्द कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Struggling with one stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.