वीज चोरी पकडणा-या पथकास मारहाण

By Admin | Updated: October 23, 2016 01:52 IST2016-10-23T01:52:31+5:302016-10-23T01:52:31+5:30

महावितरणच्या पथकाशी घातला वाद; खामगाव ग्रामीण पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

Strike the power stealing driver | वीज चोरी पकडणा-या पथकास मारहाण

वीज चोरी पकडणा-या पथकास मारहाण

खामगाव, दि. २२- वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाशी वाद घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत मारहाण केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कोलोरी सबस्टेशनचे सहायक अभियंता कुणाल ठाकरे (३२) यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की १८ ऑक्टोबर रोजी पथकासह पिंप्राळा येथे गेलो असता त्याठिकाणी समाज मंदिराच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी अवैधरीत्या वीज तारांवर आकोडा टाकून वीज चोरी होत असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केली असता गावातील श्रीकृष्ण पेसोडे, पुरुषोत्तम पेसोडे, पुरुषोत्तम पेसोडे यांची पत्नी व कंत्राटदार यांनी वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरुन कंत्राटदारासह उपरोक्त तिघांविरुद्ध कलम ३५३, ३२३, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Strike the power stealing driver