हिवरा आश्रम येथे कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST2021-04-27T04:35:17+5:302021-04-27T04:35:17+5:30
प्रशासनाच्या आदेशानुसार हिवरा आश्रम येथे कोरोना चाचणी व लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात ...

हिवरा आश्रम येथे कडकडीत बंद
प्रशासनाच्या आदेशानुसार हिवरा आश्रम येथे कोरोना चाचणी व लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय मंगळवार, बुधवार व गुरुवार हे तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत असून, तशी माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. बंदमध्ये लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे.
सदाशिव म्हस्के, ग्रामविकास अधिकारी, हिवरा
डाॅक्टरांना ग्रामपंचायतीचे पत्र
आपणाकडे जे रुग्ण उपचारासाठी येतात त्यांना आपण उपचार देण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली आहे की नाही याची खात्री करावी. जर कोरोनाची तपासणी केली नसेल तर कोणत्याही शासकीय संस्थेमध्ये जाऊन तपासणी करून घेण्यास सांगण्यात यावे. नंतर पुढील उपचार करावे, असे निर्देश ग्रामपंचायत प्रशासनाने दिले आहेत. अनेक डाॅक्टर कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णावर उपचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोविड सेंटरची परवानगी नसताना उपचार करण्यात येत असल्याने ही गंभीर बाब आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आधी काेराेना चाचणी करण्यास सांगावे, असेही पत्रात म्हटले आहे.