गुन्हेगारीत वाढ झाल्याने पोलिसांवर ताण, हजार नागरिकांमागे एकच पोलीस कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:48+5:302021-02-05T08:34:48+5:30

गुन्हेगारीत ११ टक्क्यांनी वाढ जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्षात गुन्हेगारीमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरफोडी, खून, ...

Stress on police due to increase in crime, only one police officer for every thousand citizens | गुन्हेगारीत वाढ झाल्याने पोलिसांवर ताण, हजार नागरिकांमागे एकच पोलीस कर्मचारी

गुन्हेगारीत वाढ झाल्याने पोलिसांवर ताण, हजार नागरिकांमागे एकच पोलीस कर्मचारी

गुन्हेगारीत ११ टक्क्यांनी वाढ

जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्षात गुन्हेगारीमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरफोडी, खून, बलात्कार, सरकारी नोकरांवर हल्ला, अपहरण, दंगे, वाहन चोरी, विनयभंग अशा भाग १ ते पाच गुन्ह्यांची संख्या २०२० मध्ये ५००५ झाली होती. २०१९ मध्ये ही संख्या ४४७७ एवढी होती. दरम्यान, गुन्ह्यांची उकल करण्यात बुलडाणा पोलिसांनी २०२० मध्ये बाजी मारली असून घडलेल्या गुन्ह्यांपैकी ८१ टक्के गुन्हे उघड करण्यात यश मिळविले. मात्र, पोलिसांवर ताण वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे.

निकष बदलाची गरज

सध्या लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यातील पोलिसांची संख्या ही १९६१ च्या निकषानुसार आहे. राज्यस्तरावरच यासंदर्भात बदल केला गेला नाही. त्यामुळे वाढती लोकसंख्या तथा गुन्ह्याचे बदलते स्वरूप व आधुनिकता पाहता पोलीस दलाच्या दृष्टीने हा निकषही बदलण्याची गरज आज निर्माण झाली आहे. येत्या काळात राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती होणार असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्याही वाढविण्याची आवश्यकता आहे.

कोट

तुलनेने कमी मनुष्यबळ असले तरी जबाबदारी निश्चित करून गुणात्मक काम करण्यास जिल्हा पोलीस दल प्राधान्य देत आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मधल्या काळात दंगाकाबू पथकाचे पुनर्गठन करण्यात येवून पोलीस दलातील वातावरण मैत्रिपूर्ण ठेवण्यास व पोलिसांचा ताण कमी करण्यास आपण प्राधान्य दिले आहे.

अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा

Web Title: Stress on police due to increase in crime, only one police officer for every thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.