लहान मुलांच्या भांडणावरून तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:05 IST2017-07-20T00:05:41+5:302017-07-20T00:05:41+5:30

खामगाव : लहान मुलांच्या भांडणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वा. च्या सुमारास शहरातील चांदमारी भागामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Stress on Child Marriage | लहान मुलांच्या भांडणावरून तणाव

लहान मुलांच्या भांडणावरून तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लहान मुलांच्या भांडणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वा. च्या सुमारास शहरातील चांदमारी भागामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चांदमारी भागामध्ये राहणाऱ्या नाझराबी शे.अनिस (वय ३५) रा. चांदमारी यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आनंद प्रकाश गायगोळ व उषा प्रकाश गायगोळ यांनी त्यांचा मुलगा शे. आवेस हा शिकवणी वर्ग करून परत येत असताना त्याला मारहाण केली. याबाबत हटकले असता केस ओढून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
उषा प्रकाश गायगोळ (वय ४५) रा. चांदमारी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांच्या घरासमोर येऊन काहीही कारण नसताना नाझराबी शे.अनिस शाईस्ता शे.अस्लम व हाजीरा या तिघांनी त्यांना व त्यांच्या मुलाला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून शहर पोलिसांनी परस्परांविरुद्ध तक्रारीवरून ५०४, ५०६, ३२३, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Web Title: Stress on Child Marriage