तारांच्या घर्षणाने पेटले झाड
By Admin | Updated: October 21, 2014 22:58 IST2014-10-21T22:58:58+5:302014-10-21T22:58:58+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील घटना.

तारांच्या घर्षणाने पेटले झाड
जळगाव जामोद (बुलडाणा): खेर्डा रस्त्यावर वसंतराव दांडगे यांच्या शेतासमोर रोडच्या डाव्या बाजूने गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणाने भले मोठे हिरवे झाड पेटल्याची घटना आज २१ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
सदर प्रकार हा सकाळी फिरायला जाणार्यांना दिसला; परंतु सकाळी कुठलाही वीज वितरण कर्मचारी अथवा अधिकार्यांचा फोनही लागत नव्हता. तर सदर शॉर्ट सर्किट विझविणेसुद्धा धोक्याचे होते. त्यामुळे हा प्रकार पाहण्यापलीकडे कुठलाही इलाज नव्हता. सदर झाडाला लागूनच विद्युत तार गेलेले आहेत आणि या तारांचे घर्षण झाडाला होत राहते त्यातून शॉर्ट सर्किटने हळूहळू या झाडाने पेट घेतलाचे परिसरातील नागरिकांनी पाहीले.