शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव, मलकापूर, शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा

By विवेक चांदुरकर | Updated: May 27, 2024 12:51 IST

झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव - मलकापूर: खामगाव, मलकापूर, शेगाव तालुक्यात वादळी वार्याचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून पडली असून, झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मलकापूर तालुक्यात विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात झाडांची फांदी डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

रविवारी सायंकाळी मलकापूर तालुक्यात विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्याच वेळी बेलाड येथे वादळी वाऱ्यामुळे झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या. स्थानिक रहीवाशी निवृत्ती घंसाराम इंगळे (वय ६४) राहत्या घरी पाऊस आल्यावर सामानाची आवराआवर करीत होते. त्याचवेळी जोमाने वारा सुटला व घरालगतच्या झाडाची फांदी निवृत्ती घंसाराम इंगळे यांच्या डोक्यावर पडली. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मलकापूर येथे हलविण्यात आले.

मात्र डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर करीत आहेत. मलकापूर शहरातील भीमनगरात विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पुरातन शिवमंदिराचा खांब कोसळला. त्यात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात मलकापूर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसMalkapurमलकापूरkhamgaonखामगाव