जागेच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:44+5:302021-09-12T04:39:44+5:30
तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील आशा गौतम खरात (२४ रा. रुईखेड मायंबा) यांनी तक्रार दिली की, यातील आरोपी विलास किशोर ...

जागेच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी
तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील आशा गौतम खरात (२४ रा. रुईखेड मायंबा) यांनी तक्रार दिली की, यातील आरोपी विलास किशोर जाधव, अमोल किशोर जाधव, भास्कर दौलत जाधव, किशोर दौलत जाधव, सुरेश देविदास बोर्डे यांनी फिर्यादीचा भाऊ स्वतः च्या जागेत अँगल लावत असताना आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत चाकू आणि लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण केली. या तक्रारीवरुन आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर विलास किशोर जाधव (३३,रा. रुईखेड मायंबा) यांनी तक्रार दिली की, आरोपी मंगेश हिवाळे, अनिल हिवाळे, राजू हिवाळे, रवी हिवाळे, श्रीरंग हिवाळे, राहुल हिवाळे, सोनू हिवाळे, अरुणा हिवाळे, दीक्षा हिवाळे, पुष्पा हिवाळे, रत्ना हिवाळे, आशा हिवाळे यांनी जागेचा वाद मिटला असताना फिर्यादी व इतरांना वाद घालत कुऱ्हाडीने व लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत फिर्यादीच्या बहिणीचा वाईट उद्देशाने हात पकडला. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एका गटातील रवींद्र श्रीरंग हिवाळे, रत्ना श्रीरंग हिवाळे, तर दुसऱ्या गटातील विलास जाधव, अमोल जाधव, भास्कर जाधव, किशोर जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास धाड पोलीस करत आहेत.