देऊळघाटवासीयांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 01:59 IST2016-05-31T01:59:57+5:302016-05-31T01:59:57+5:30

दोन गावात पाण्यासाठी संघर्ष; आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित

'Stop the road' of the people of Dellghat | देऊळघाटवासीयांचा ‘रास्ता रोको’

देऊळघाटवासीयांचा ‘रास्ता रोको’

बुलडाणा : तालुक्यातील दहीद बु. धरणावरून देऊळघाटसाठी असलेल्या पाइपलाइनचे काम दहीद ग्रामवासीयांनी अडवले आहे, ते काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात यावे व पाणी पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी ९ वाजता देऊळघाट बसस् थानकावर एक तास 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.
बाराही महिने पाणी टंचाईचा सामना करणार्‍या देऊळघाटमधील विहिरी, हातपंप ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्येच आटतात, तसेच गावात पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने गावातील जनतेला पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. या गावासाठी दहिद येथील धरणावरुन पाइ पलाइन टाकलेली असून, तेथे विंधन विहीर व विहीर आहे; परंतु मागील दहा वर्षे या पाणी पुरवठा योजनेकडे ग्रामपंचायत व तत्कालीन सरपंचांनी दुर्लक्ष केल्यामुळे पाइपलाइन खराब झाली, तसेच देऊळघाटच्या विहिरीवर दहिद ग्रामपंचायतीने ताबा करुन दहिदसाठी पाणी पुरवठा सुरु केला आहे.
दरम्यान, देऊळघाट ग्रामपंचायतमध्ये सत्तापालट झाल्यानंतर नवीन सर पंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी दहिद पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी शासनाकडे रेटा धरला. तेव्हा शासनाकडून पाइपलाइन दुरुस् तीसाठी जवळपास १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पाइपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी जेसीबी मशीन दहिद धरणावर पोहोचली असता, तेथील काही नागरिकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून काम करू दिले नाही. एकीकडे देऊळघाटवासी पाण्यासाठी भटकंती करत आहेत तर दुसरीकडे दहिद ग्रामपंचायतने देऊळघाटला पाणी न देण्याचा ठराव घेतला.
त्यामुळे देऊळघाट ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सर पंच आरिफ खान, उपसरपंच बंडू सपकाळ, ग्रा.पं.सदस्य मुश्ताक अहेमद, हाजी इद्रीस बागबान, गजनफर खान, विकास देशमुख, बाळू लवंगे, युनूस खान, याकुब पठाण, कदिर ठेकेदार, साहेबराव खंडारे, रमेश गोरे, प्रशांत देशमुख, सखाराम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान, प्रा.मो.युसूफ अन्सारी, चंदु सपकाळ, शेख इसराईल, गुलाम रसुलखान, सै.इमरान, शेख दय्यान, हमीद खान, मनशाऊर रहेमान, दिलीप खराडे, केशव जाधव, सतीश टेलर, शेख आरिफ, इमरान हार्डवेअर, रिजवान देशमुख, साबीर खान, सय्यद तजम्मुल, नंदु लवंगे, सलिमखान, युसूफ टेलर, जुबेर खान, सय्यीद खान, शेख अमान, शेख दैयान, स. युबेद, स.कालु, अनिस खान, शेख उस्मान यांच्यासह देऊळघाट येथील असंख्य नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार ए.बी.भामरे, एपीआय निचळ मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन हजर होते.

Web Title: 'Stop the road' of the people of Dellghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.