काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: February 17, 2015 01:20 IST2015-02-17T01:20:34+5:302015-02-17T01:20:34+5:30
नांदुरा येथे भुमिअधिग्रहण कायदा रद्द करावा या मागणीसाठी आंदोलन.
काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन
नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता येथे विविध मागण्यांकरिता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी भुमिअधिग्रहण कायदा रद्द करावा, पेट्रोल, डिझेलचे भाव जागतीक बाजारपेठेत कमी होऊन सुध्दा केंद्र सरकारने भाव कमी केले नाही, केंद्र व राज्यसरकारने अद्याप कर्जमाफी केली नाही, यावर्षी कापूस व सोयाबिनचे पिक नसून सुध्दा भाववाढ दिलेली नाही, रेशन दुकानदारांच्या संपूर्ण मागण्या पुर्ण करण्यात याव्या, विदेशात असणारा काळा पैसा केंद्र सरकारने परत आणावा या व इतर मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ.अरविंद कोलते, रशिदखाँ जमादार, उमाताई तायडे, हरिषभाऊ रावळ, विजयसिंह राजपूत, शा.का.कळसकार, बलदेवराव चोपडे, भगवान धांडे, नितीनभाऊ देशमुख, डिगांबर इंगळे सहभागी झाले होते.