‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:22 IST2017-11-20T00:15:56+5:302017-11-20T00:22:31+5:30
‘दशक्रिया’ या नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रसारित होत आहे. या चित्रपटात ब्राह्मण समाज व ब्राह्मण, पुरोहितांची निंदा करण्यात आली आहे. याचा श्री भगवान परशुराम प्रतिष्ठान, मेहकर व मारवाडी ब्राह्मण समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला.

‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागाणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: ‘दशक्रिया’ या नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रसारित होत आहे. या चित्रपटात ब्राह्मण समाज व ब्राह्मण, पुरोहितांची निंदा करण्यात आली आहे. याचा श्री भगवान परशुराम प्रतिष्ठान, मेहकर व मारवाडी ब्राह्मण समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला असून, ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा १७ नोव्हेंबर रोजी उ पविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांना निवेदनातून करण्यात आला आहे.
यावेळी श्री भगवान परशुराम प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष जयदीप दलाल, नगरसेवक विकास जोशी, मुन्ना महाराज दायमा, नीलेश बावणे, किरण सुरेश जोशी, आनंद शर्मा, संदीप तट्टे, राजेश अंतरकर, सचिन जोशी, दिनकर सदावर्ते, प्रा.डॉ. पाटील, डॉ. सतीश पळसोकर, रविशंकर अवस्थी, अनिल जांभोरकर, संजय शर्मा, प्रमोद शर्मा, मनोज महाराज, नंदकिशोर बारोटे, प्रवीण बोडखे, गणेश शेलगेनवार, नरहरी जोशी, जयदेव पितळे आदी उपस्थित होते.