बससाठी विद्यार्थ्यांसह गावकर्यांचा रास्ता रोको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:53 IST2017-09-26T00:53:04+5:302017-09-26T00:53:09+5:30
मेहकर: ग्रामीण भागातून दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी मेहकर तथा इतरत्र ये-जा करतात. सर्व विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात; मात्र अनेक गावच्या एसटी बसेस शाळेच्या वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर मेहकर ते घाटबोरी ही बस शाळेच्या वेळेवर सोडावी यासाठी २५ सप्टेंबर रोजी विद्यार्थी व पालकांनी लोणीगवळी येथे रास्ता रोको आंदोलन केले.

बससाठी विद्यार्थ्यांसह गावकर्यांचा रास्ता रोको!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: ग्रामीण भागातून दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी मेहकर तथा इतरत्र ये-जा करतात. सर्व विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात; मात्र अनेक गावच्या एसटी बसेस शाळेच्या वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर मेहकर ते घाटबोरी ही बस शाळेच्या वेळेवर सोडावी यासाठी २५ सप्टेंबर रोजी विद्यार्थी व पालकांनी लोणीगवळी येथे रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मेहकर ते घाटबोरी या बस फेरीवर दररोज विद्यार्थी प्रवास करतात; मात्र सदर बसफेरी शाळेच्या वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बसफेरीमध्ये जवळपास ७0 ते ७५ विद्यार्थी प्रवास करतात. मेहकर ते घाटबोरी ही बस घाटबोरी येथे मुक्कामी असल्यास दररोज शाळेच्या वेळेवर येऊ शकते; मात्र सदर बस घाटबोरी येथे मुक्कामी राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसात होत आहे. सदर बस शाळेच्या वेळेवर सोडावी, यासाठी लोणीगवळी येथे रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता रोकोमुळे सकाळची वाहतूक ठप्प झाली होती. रास्ता रोकोची त त्काळ दखल घेऊन मेहकर आगाराचे राठोड व जुमडे यांनी शाळेच्या वेळेवर बस सोडण्याचे आश्वासन दिले.