बँका, फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:19+5:302021-04-23T04:37:19+5:30
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक, शेतकरी व हातावर पोट ...

बँका, फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबवा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक, शेतकरी व हातावर पोट असणारे मजूर हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, विविध कारणांकरिता त्यांनी घेतलेले बँक, फायनान्स कंपन्या त्याचप्रमाणे वैध सावकार यांच्याकडून घेतलेले कर्ज सद्यस्थितीत भरू शकत नाही. त्यामुळे ही कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोनाबांधितांची संख्या व मृत्यूचा आकडा वाढत असल्यामुळे लोकांच्या मनात भीती वाढली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे छोटे, मोठे सर्वच उद्योग-व्यवसाय बंद आहेत. मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्वजण सध्याच्या घडीला आर्थिक अडचणीत आहेत. हाताला काम नाही. व्यवसाय, उद्योग बंद असल्याने घरात पैसे येणे बंद झाले आहे. आपले कुटुंब कसे चालवायचे, हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. आशा परिस्थिती शासनाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असून त्यांना शासनाकडून आर्थिक मदतीचा हात हवा आहे. मात्र बँक, फायनान्स कंपन्या, परवानाधारक सावकार यांची कर्ज वसुली सुरूच आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिक, कामगार वर्ग मोठ्या अडचणीत आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून बँका, फायनान्स कंपन्या व परवानाधारक सावकारांची कर्ज वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसंग्राम संघटनेचे राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत खान, चंद्रभान झिने, संतोष हिवाळे, अयाज पठाण आदींनी केली आहे.