राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक, दहा वाहनांचे नुकसान; वाहतूक झाली होती ठप्प
By अनिल गवई | Updated: May 30, 2023 15:55 IST2023-05-30T15:53:49+5:302023-05-30T15:55:55+5:30
मध्यरात्री खामगाव शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात समाजकंटकांच्या टोळक्याने धावत्या वाहनांवर दगडफेक केली.

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक, दहा वाहनांचे नुकसान; वाहतूक झाली होती ठप्प
खामगाव : शहरापासून नजीकच असलेल्या नवीन राष्ट्रीय महामार्गावर धावत्या आठ ते दहा वाहनांवर मध्यरात्री अज्ञात इसमांनी दगडपफेक केली. यामुळे एका खासगी लक्झरीबससह काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना माक्ता कोक्ता नजीक घडली.
मध्यरात्री खामगाव शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात समाजकंटकांच्या टोळक्याने धावत्या वाहनांवर दगडफेक केली. यात खाजगी लक्झरी बस, कार, ट्रक्स सह नऊ ते दहा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. मात्र दगडफेक कुणी व का केली याचा तपास अद्याप लागलेला नाही. यामुळे या परिसरात दहशत असून वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दगडफेकीत खाजगी लक्झरी बस, कार, ट्रक अशा ८ ते १० वाहनांचे मोठे नुकसान झाले.
बराच वेळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक दहशतीमुळे थांबली होती. शहर पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत, वाहतूक सुरळीत केली. ही दगडफेक कुणी केली, का केली याचा तपास शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील करीत आहेत.