नऊ महिन्यांत चोरीच्या घटना वाढल्या!

By Admin | Updated: April 24, 2017 00:27 IST2017-04-24T00:06:31+5:302017-04-24T00:27:59+5:30

पोलीस विभागाकडून ७७ विशेष मोहीम : २१७ तक्रारकर्त्यांना परतविले ४ कोटी २४ लाख रुपये

Stolen incidents have increased in nine months! | नऊ महिन्यांत चोरीच्या घटना वाढल्या!

नऊ महिन्यांत चोरीच्या घटना वाढल्या!

बुलडाणा : गत नऊ महिन्यात जिल्ह्यात चोरी व लुटमारीच्या बऱ्याच घटना घडल्या. या वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने ७७ विशेष मोहिमी राबविल्या. यात २१७ तक्रारकर्त्यांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे कारवाई करुन चोरट्यांना गजाआड केले. या दरम्यान चोरट्यांकडून ४ कोटी २४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो तपासाअंती तक्रारकर्त्यांना परत केला.
बुलडाणा जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून चोरी व लुटमारीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब गांभीर्याने घेत, पोलीस प्रशासनाकडून गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला विशेष सूचना देऊन सर्तक ठेवण्यात आले आहे. शिवाय वाढत्या गुन्हेगारी घटना थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने जबाबदारी घेऊन अतिरिक्त पोलीस पथकही सज्ज ठेवले आहे.
जिल्ह्यात नऊ महिन्यांपासून चोरीच्या बऱ्याच लहान-मोठ्या घटना घडल्या. या घटनांना मुळापासून संपविण्यासाठी पोलीस विभागाने ७७ विशेष मोहिमा राबविल्या. या दरम्यान २१७ नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारीच्या आधारे तपासचक्र फिरवून सर्व चोरट्यांना गजाआड करण्यात आले. शिवाय ४ कोटी २४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तपासअंती तक्रारकर्त्यांना परत देण्यात आला.

अमरावती विभागात २२४ कारवाया
अमरावती विभागातील या वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाकडून गत नऊ महिन्यात २२४ विशेष मोहीम आखण्यात आल्या. मोहिमेदरम्यान ६०२ नागरिकांनी पुढाकार घेत चोरी व लुटमारीच्या घटनाबाबत तक्रारी केल्यामुळे पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यास मदत मिळाली. या सर्व प्रकरणात पोलिसांकडून ७ कोटी ११ लाख ८१ हजार २८२ रुपयांचा माल जप्त करुन तो तक्रारकर्त्यांना परत करण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी आपली जबाबदारी ओळखून काम करीत आहे. शिवाय विशेष मोहीम राबविल्यामुळे जिल्ह्यातील चोरी, लुटमारी व इतर गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
- संजयकुमार बाविस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा

Web Title: Stolen incidents have increased in nine months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.