चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या युवकास मारहाण
By Admin | Updated: April 20, 2017 23:36 IST2017-04-20T23:36:08+5:302017-04-20T23:36:08+5:30
खामगाव- चोरीच्या उद्देशाने रात्री घरात शिरल्याच्या संशयावरून युवकास मारहाण केल्याची घटना शहरानजीकच्या टेंभुर्णा येथे घडली.

चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या युवकास मारहाण
खामगाव : चोरीच्या उद्देशाने रात्री घरात शिरल्याच्या संशयावरून युवकास मारहाण केल्याची घटना शहरानजीकच्या टेंभुर्णा येथे घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी प्रणाल तुळशीराम मोरे (वय ३८) रा.टेंभूर्णा यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, की गावातीलच आकाश सदानंद मोरे (वय १७) हा १७ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरला. यावेळी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असताना झटापट करुन पळून गेला. यावरून पोलिसांनी आकाश मोरे याच्याविरुद्ध कलम ४५७, ५११ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच जितेंद्र सदानंद मोरे (वय ३०) रा.टेंभूर्णा याने फिर्याद दिली, की मजुरीचे पैसे मागण्यासाठी माझा भाऊ आकाश हा प्रणाल मोरे याच्या घरी गेला असता त्यास प्रणाल मोरे व इतर दोघांनी वाद घालत काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच वाद सोडविण्यासाठी गेलो असता मलासुद्धा मारहाण करण्यात आली. या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी प्रणाल मोरेसह तिघांविरुद्ध कलम ३२४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.