पिंपळगाव येथे चाकूचा धाक दाखवून ट्रक चोरला!

By Admin | Updated: April 28, 2017 00:13 IST2017-04-28T00:13:59+5:302017-04-28T00:13:59+5:30

पिंपळगाव सैलानी : पिंपळगाव सराई - सैलानी रस्त्यावर ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी मोटारसायकलच्या टायरने भरलेला आयशर ट्रक २६ एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी चालकासह पळविला.

Stole a truck by knife in Pimpalgaon! | पिंपळगाव येथे चाकूचा धाक दाखवून ट्रक चोरला!

पिंपळगाव येथे चाकूचा धाक दाखवून ट्रक चोरला!

पिंपळगाव सैलानी : पिंपळगाव सराई - सैलानी रस्त्यावर ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी मोटारसायकलच्या टायरने भरलेला आयशर ट्रक २६ एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी चालकासह पळविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक पकडला व आरोपींना अटक केली.
ट्रक चोरी गेल्याची माहिती मिळाल्यावर ठाणेदार जे. एन. सय्यद, ए.एस.आय. यशवंत तायडे, ए.एस.आय. बबनराव सनगाळे, प्रकाश शिंबरे, सुमेरसिंग ठाकूर, सुरेश मोरे, विजय पैठणे, शेख कय्यूम यांनी या ट्रक चोरट्यांचा रात्रभर शोध घेऊन एमएच १५ एबी ५२५३ क्रमांकाचा मालाने भरलेला आयशर ट्रक धाड पोलीस स्टेशन हद्दीतील म्हसला या गावाजवळ पकडला व आरोपी सलीम शेरखा पठाण रा.कोळवेवाडी याला अटक केली.
सदर आरोपीने ट्रकचालक सोबीनसिंग रामरक्षसिंग वय ४८ वर्ष रा.मठीया कुसमीबाजार जि.गोरखपूर पो.स्टे.पिंपराईज उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. या ट्रक चालकाला सैलानी येथे आमावस्येच्या गर्दीचा फायदा घेऊन चाकुचा धाक दाखवून त्याला मारहाण करून ट्रक भरदिवसा पळविला.
याप्रकरणी आरोपी सलीम शेरखा पठाण यांच्यावर कलम ३९४ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Stole a truck by knife in Pimpalgaon!