Sting operation : खामगावात बाजार समिती संचालकासमोर ‘उलटी हर्राशी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:20 IST2019-03-13T18:19:52+5:302019-03-13T18:20:38+5:30
खामगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव बाजार समितीत ‘उलटी हर्राशी’चा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये १३ मार्चरोजी उघडकीस आला.

Sting operation : खामगावात बाजार समिती संचालकासमोर ‘उलटी हर्राशी’
- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव बाजार समितीत ‘उलटी हर्राशी’चा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये १३ मार्चरोजी उघडकीस आला. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत बाजार समिती प्रशासनाबाबत काही शेतकºयांनी बुधवारी तक्रार दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अखेर संबधित शेतकºयांनी लोकमतकडे धाव घेतली.
सध्या बाजारपेठेत गहू, तूर, हरभरा, सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय भूईमुगाच्या शेगा, उडीद, मुग, करडई विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. वास्तविक पाहता जिल्हयातील सर्व बाजार समित्यामध्ये सरळ हर्राशीद्वारे शेतकºयांचा माल खरेदी करण्यात येतो. नियमानुसार शासकीय हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली व्यापाºयांनी लावली पाहिजे. यातून शेतकºयांना जास्तीत जास्त भाव मिळतो. परंतू खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उलटी हर्राशी सुरु केली असून यातून शेतकºयांनी लुबाडणूक व आर्थीक लुट होत आहे. जे शेतकरी विरोध करतात त्यांचा माल सुद्धा व्यापारी खरेदी करीत नसल्याची मनमानी करीत आहेत. यामुळे शेतकºयांची कोंडी होत आहे. बुधवारी, १३ मार्चरोजी खामगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्याची आवक होती. जालना, बुलडाणा, अकोला, परभणी या जिल्हयातून शेतकºयांनी माल विक्रीस आणला होता. सकाळपासून उलटी हर्राशी सुरु असल्याचे शेतकºयांचे लक्षात आले. त्यामुळे काही शेतकºयांनी माल विकण्यास विरोध दर्शवला. तर काहींही बाजार समिती संचालकाकडे धाव घेतली. मात्र त्यांचे कुणीही ऐकले नाही. त्यानंतर हताश झालेले शेतकरी दुपारी ३ वाजेपर्यंत बसून होते. काही व्यापाºयांनी दुपारी ३ नंतर हर्राशीला सुरवात केली. परत उलटी हर्राशीचा तोच प्रकार सुरुच होता. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकºयांकडे पैसा नाही अशा अवस्थेत मुलींचे लग्न, शिक्षणाचा खर्च कसा भागवावा ही विवंचना शेतकºयांना आहे.