बुलडाण्यात परदेशी पाहुण्यांचा मुक्काम

By Admin | Updated: October 27, 2014 23:26 IST2014-10-27T23:26:06+5:302014-10-27T23:26:06+5:30

हिवाळ्याची चाहूल, स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात.

Stay at foreign tourists in bulldog | बुलडाण्यात परदेशी पाहुण्यांचा मुक्काम

बुलडाण्यात परदेशी पाहुण्यांचा मुक्काम

बुलडाणा : गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात थंडी जाणवत असून, स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्याला निसर्गसौंदर्य लाभल्यामुळे अनेक परदेशी पाहुणे विविध जंगल परिसरात तसेच पाणवठय़ावर मुक्कामाला आहेत.
हिवाळ्याच्या प्रारंभापासून देश-विदेशातून भारतात स्थलांतर करून येणारे पाहुणे पक्षी परिसरातील जंगलामध्ये व धरणावर दिसू लागतात. यामध्ये युरोपमधून व उत्तरेकडील मंगोलिया, सायबेरिया, रशिया, चीन, तिबेट आदी देशांमधून येणारे बदक, दलदलीतील वेडर्स यांची संख्या मोठी असते. सध्या बुलडाणा परिसरातील येळगाव धरण परिसरात उलीनेक स्टॉक (पांढर्‍या मानेचा करकोचा), तसेच बोथा येथील जंगलात युरोपीयन रोलरचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेक पक्षप्रेमी येळगाव धरणावर धाव घेत आहेत. येणार्‍या काळात बुलडाणा जिल्ह्यातील विविध जंगल तसेच विविध पाणवठा परिसरात अनेक परदेशी पक्षी मुक्कामाला राहणार आहेत. त्यात उलीनेक स्टॉक (पांढर्‍या मानेचा करकोचा), कॉपरस्मिथ बॉरबेट (तांबट), रेडनॅप इबिस ( कुदळ्या ), फ्लेम बॅक ( सोनपाठी सुतार), इंडियन रोलर (निलपंख), व्हाईट वॅगटेल (परिट ), पॅटेंट स्टॉर्क (चित्रबलाक रंगित करकोचा), स्पुनबिल स्टार्क (चमचा करकोचा ) यांचा समावेश राहणार आहे. याशिवाय स्थलांतराचा काळ न घालविणारा व फक्त प्रवासादरम्यान दिसणारा युरोपीयन रोलर (विदेशी निलपंख) बुलडाणा जिल्ह्यातील बोथ्याच्या जंगलात थांबलेला आहे. हिमालयातून युरोप व द. आफ्रिकेमध्ये विणीसाठी स्थलांतर करून जाणारा हा पक्षी यावेळी तेथून मोठे झालेल्या िपल्लांना घेऊन हिमालयाकडे परतीच्या प्रवासास निघतो व ऑक्टोबरदरम्यान काही काळ तो बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भामध्ये आढळून येतो, अशी माहिती पक्षमित्र अक्षय जोशी यांनी दिली.

*येळगाव परिसरात पांढरा करकोचा
बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव येथील स्व.भोंडे सरकार जलाशय परिसरात यावर्षी पांढर्‍या मानेचा करकोचाचे आगमन झालेले आहे. बोथा येथे युरोपीयन रोलरचे आगमन झालेले असून, डोगगाव येथील पक्षमित्र डॉ. चराटे यांनी त्यांची नोंद घेतली आहे.

Web Title: Stay at foreign tourists in bulldog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.