जिजाऊंच्या जन्मस्थळावर लखुजीराजेंचा पुतळा उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:56+5:302021-09-27T04:37:56+5:30

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी व भविष्यात त्यांचा जीर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने खा.सुप्रिया सुळे सिंदखेडराजा येथे आल्याच्या निमित्ताने त्यांना ...

A statue of Lakhuji Raje should be erected at the birthplace of Jijau | जिजाऊंच्या जन्मस्थळावर लखुजीराजेंचा पुतळा उभारावा

जिजाऊंच्या जन्मस्थळावर लखुजीराजेंचा पुतळा उभारावा

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी व भविष्यात त्यांचा जीर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने खा.सुप्रिया सुळे सिंदखेडराजा येथे आल्याच्या निमित्ताने त्यांना निवेदन देण्यात आले. माँ जिजाऊंनी बाल्यावस्थेतच स्वराज्याची प्रेरणा पिता लखुजीराजेंकडून घेतली होती. तत्कालीन तीन शाहींच्या विरोधात उभे राहून विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र करण्याचे कार्य लखुजीराजेंनी त्या काळात केले होते. याकरिता अत्यंत मजबूत अशा काळाकोट किल्ल्याच्या उभारणीचे कार्यही त्यांनी हाती घेतले होते. त्यांचा इतिहास येणाऱ्या पिढीस प्रेरणादायी ठरावा, याकरिताच लखुजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा राजवाड्यात उभारावा, असे खा. सुळेंना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनासमवेतच लखुजीराजेंचे सिंहासनावर विराजमान, असे छायाचित्र पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे व रा.काँ.जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्या उपस्थितीत खा.सुप्रिया सुळे देण्यात आले. यावेळी अमोल भाट, नवाज पठाण, सचिन मांटे आदींची उपस्थिती होती.

Web Title: A statue of Lakhuji Raje should be erected at the birthplace of Jijau