बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आमदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST2021-07-04T04:23:47+5:302021-07-04T04:23:47+5:30

संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्या मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनात ...

Statement of BAMS Medical Officer to MLAs | बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आमदारांना निवेदन

बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आमदारांना निवेदन

संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्या मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनात ‘राज्यातील वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे गट अ मध्ये समावेशन करणे’ या मुख्य मागणीसह अस्थायी कालावधीतील खंड क्षमापन करणे, शासन निर्णयानुसार ‘बीएएमएस’ वैद्यकीय अधिकारी गट ब यांना प्रमोशन देणे, मागील १२-१३ वर्षांतील प्रलंबित लाभ प्रदान करणे, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाभ देणे, अतिरिक्त वेतन वाढ देणे आदींसह इतर मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी जिल्हाअध्यक्ष डॉ. सुरेंद्र सरदार, डॉ. संतोष साबळे, तसेच डॉ. प्रवीणकुमार निकस, डॉ. उमेश निमदेव सह तालुका प्रतिनिधी व जिल्हा सदस्य उपस्थित होते.

Web Title: Statement of BAMS Medical Officer to MLAs