राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण
By Admin | Updated: September 22, 2014 00:46 IST2014-09-22T00:12:51+5:302014-09-22T00:46:47+5:30
१९ वर्षाआतील मुलींच्या स्पर्धेत प्रथम पुणे विभाग, द्वितीय मुंबई विभाग.

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण
बुलडाणा : खेळावर निष्ठा ठेवून सातत्याने खेळाचा सराव केल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल. अपयशाने खचून न जाता यशासाठी प्रयत्न करणे, ध्येय निश्चीत करुन सातत्याने त्याचा पाठलाग केला तर तुम्ही यशस्वी खेळाडू व्हाल, असे विचार अप्पर पोलिस अधिक्षक श्वेता खेडकर यांनी व्यक्त केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेच्या घेण्यात आल्या. त्यांनतर २0 सप्टेंबर रेाजी झालेल्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवड समिती सदस्य संजय कडू, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे जयसिंग जयवार, राज्य क्रीडा परिषद सदस्य राजेश महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांची उपस्थित होती. या क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाआतील स्पर्धेत प्रथम क्रमांक मुंबई विभाग, द्वितीय पुणे विभाग, तृतीयक्रीडा प्रबोधिनी, बुलडाणा तर १७ वर्षाआतीत मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मुंबई विभाग, द्वितीय क्रीडा प्रबोधिनी, बुलडाणा आणि तृतीय कोल्हापूर तर १९ वर्षाआतील मुलींच्या स्पर्धेत प्रथम पुणे विभाग, द्वितीय मुंबई विभाग, तृतीय क्रमांक नागपूर विभाग यांनी मिळविला. सर्व विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते विजय चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी आंध्रप्रदेश येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्याच्या १४,१७,१९ वर्ष मुलींच्या संघाची घोषणा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केली. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.