मतदार यादी पुनर्रचना व दुरस्ती सुरू करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:39 IST2021-08-13T04:39:29+5:302021-08-13T04:39:29+5:30

चिखली : आगामी नगर पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर मतदार याद्या अद्यावत करण्यात याव्यात, अशी मागणी ...

Start Voter List Reconstruction and Correction! | मतदार यादी पुनर्रचना व दुरस्ती सुरू करा !

मतदार यादी पुनर्रचना व दुरस्ती सुरू करा !

चिखली : आगामी नगर पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर मतदार याद्या अद्यावत करण्यात याव्यात, अशी मागणी महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

यानुषंगाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, स्थानिक पत्त्यावर न राहणारे, दोन ठिकाणी नावे असलेले व मयत झालेले मतदार वगळण्यात यावे, तसेच नवीन नाव नोंदणी सुरू करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, शहराध्यक्ष रविंद्र तोडकर, काँग्रेस शहराध्यक्ष अतरोद्दीन काझी, शिवसेना शहर प्रमुख श्रीराम झोरे, मंगेश ठेंग, शेतकरी संघटनेचे भानुदास घुबे, दीपक कदम, प्रवीण लहाने आदी उपस्थित होते.

Web Title: Start Voter List Reconstruction and Correction!