नामांकन पत्र दाखल करण्यास आज प्रारंभ

By Admin | Updated: September 19, 2014 23:17 IST2014-09-19T23:17:47+5:302014-09-19T23:17:47+5:30

पितृपक्ष ठरणार अडसर : बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांना घटस्थापनेच्या मुहूर्ताची प्रतीक्षा.

Start today to file a nomination papers | नामांकन पत्र दाखल करण्यास आज प्रारंभ

नामांकन पत्र दाखल करण्यास आज प्रारंभ

बुलडाणा : येत्या १५ आक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास उद्या २0 सप्टेबर पासून सुरूवात होत आहे. मात्र सध्या पितृपक्ष सुरू असल्याने उमेद्वारांना नामांकन अर्ज दाखल करण्यास पितृपक्षाची अडसर आहे. त्यामुळे उमेद्वारांना घटस्थापनेची प्रतिक्षा आहे. घटस्थापनेला अद्याप पाच दिवस बाकी असल्याने या पाच दिवसात नामांकन दाखल होण्याची शक्यता फार कमी आहे.
ऐन दिवाळीच्या धामधूमीत विधानसभेची निवडणूक लागल्याने ही दिवाळी कोणासाठी गोड तर कोणासाठी कडू होणार आहे. त्यातच उमेद्वारी अर्ज दाखल करण्याची तारीख ऐन पितृपक्षात आली आहे. हिंदू धर्माच्या परंपरेत पितृपक्षात एखादे चांगले कार्य हाती घेण्यास अशुभ मानल्या जाते. त्यामुळे या पंधरवाड्यात शक्यतोवर कोणीही उद्घाटन, भुमिपूजन, गृहप्रवेश अथवा एखाद्या शुभ कार्याची सुरूवात करीत नाही. निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणताना तर प्रत्येकजण मुहुर्त पाहुनच अर्ज दाखल करतात. निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार २0 सप्टेबरला अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत आहे. तर २७ सप्टेबर ही शेवटची तारीख आहे.
दरम्यान २४ सप्टेबर पर्यंत पितृपक्ष असल्याने येत्या पाच दिवस तरी म्हणजे २४ सप्टेबर पर्यंत कोणीही अर्ज दाखल करणार नाही. पितृपक्ष संपताच २५ सप्टेबरला लगेच घटनस्थापना आहे. २५ सप्टेबरला गुरूवारही येतो. गुरूवार हा दिवस शुभ मानल्या जातो.त्यामुळे पितृपक्ष संपला की दुसरे दिवशी म्हणजे घटस्थापनेला शुभ मुहुर्त माणून गुरूवार पासून अर्ज दाखल करणार्‍या उमेद्वारांचा पोळा फुटणार आहे. त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस उरतात. या दोन दिवसात निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे उमेद्वारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी होणार आहे.

**निवडणूक यंत्रणा सज्ज
उद्यापासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत असल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक मतदार संघात तहसिल कार्यालयात निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. बुलडाणा येथे उपविभागीय अधिकारी खांदे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांना सहाय्यक म्हणुन बुलडाण्याचे तहसिलदार संदिप बाजड आणि मोताळ्याचे तहसिलदार हे सहाय्य करणार आहेत.निवडणूक काळात सर्व निवडणूक विभागात काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: Start today to file a nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.