नाला बांधातील गाळ काढण्यास सुरुवात
By Admin | Updated: February 27, 2016 01:56 IST2016-02-27T01:56:10+5:302016-02-27T01:56:10+5:30
लोकसहभागातून होणार काम; पाणी साठा वाढून सिंचनाची होणार सुविधा.

नाला बांधातील गाळ काढण्यास सुरुवात
अंजनीखुर्द (जि. बुलडाणा): जलसंधारणाच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या तालु क्यातील अंजनी खुर्द येथील सिमेंट नाला बांधातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामास आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते बुधावारपासून शुभारंभ करण्यात आला आहे.
गत दोन वर्षांत पाण्याआभावी शेती पिकांचे उत्पादनात ७0 टक्के घट आली आहे. या समस्येवर मात करून सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होण्याकरिता राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत जलयुक्त शिवार हे अभियान राबवण्यात येत असून, याकरिता मोठा निधीही उपल्बध करून दिल्या जात आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचनाचे नवीन स्रोत निर्माण करताना मात्र जुन्या स्रोतांकडे दुर्लक्ष होत होते. सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी यापूर्वी विविध योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी नदी -नाल्यांवर जागोजागी साखळी पद्धतीने सिमेंट बांध बांधण्यात आले. या बांधामुळे नदी- नाल्यांच्या काठावरील दोन्ही बाजूच्या शेतकर्यांना शेतीसाठी हमखास पाणी उ पल्बध होऊन शेतकर्यांना मोठा फायदा झाला. पावसाचे पाणी जागीच अडवून ते जमिनीतच जिरवल्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी मुबलक पाणी साठा संचीत होऊन मोठय़ा प्रमाणावर शेतजमीन सिंचित झाल्या. परंतु १५ वर्षात सिमेंट नाला बांधाच्या पात्रामध्ये गाळ साचला आहे. अशा नाल्यातील गाळ काढून नाला खोलीकरण केल्यास ही समस्या बर्याच अंशी कमी होईल.
दरम्यान अंजनी खुर्द येथील सिमेंट नाला बांधातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामाचा आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार सुरेश कव्हळे, गट विकास अधिकारी ओमप्रकाश यादव, कृउबास सभापती शिव पाटील तेजनकर, पं.स. सभापती ज्ञानेश्वर चिभडे, तालुका शिवसेना प्रमुख प्रा.बळीराम मापारी, कांता पाटील वायाळ, माजी सरपंच मंडोधर चौधरी, भाजपा शहराध्यक्ष विजय मापारी, राष्ट्रवादीचे भगवान महाजन, मिलिंद पिंपरकर, बाळकृष्ण राठी व शेतकरी उपस्थित होते.