प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:51+5:302021-08-26T04:36:51+5:30

गेल्या २० ऑगस्ट रोजी प्रभाग रचनेचा कच्चा मसुदा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यासंदर्भानेच २४ ऑगस्ट ...

Start preparing a rough outline of the ward structure | प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास प्रारंभ

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास प्रारंभ

गेल्या २० ऑगस्ट रोजी प्रभाग रचनेचा कच्चा मसुदा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यासंदर्भानेच २४ ऑगस्ट रोजी ही बैठक झाली. या बैठकीद्वारे प्रत्यक्षात या निवडणुकांच्या कामांना सुरुवात झाली आहे. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत ही प्रभाग रचना तयार करून त्यावर हरकती मागविल्या जाणार आहेत. त्यानंतर यासंदर्भातील मसुदा अंतिम होईल. २०११ च्या जनगणनेनुसारच ही निवडणूक होणार आहे. प्रसंगी पुढील वर्षी ही निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्या नगरपालिकांची मुदत संपत आहे त्यावर प्रसंगी प्रशासकांची नियुक्ती केली जाऊ शकते.

--कच्चा आराखडाही गोपनीय--

पालिका निवडणुकांसाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात येत असून, हा आराखडा तयार झाल्यानंतरही तो गोपनीय ठेवण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने संबंधितांना सूचनाही दिल्या गेल्या आहेत. सोबतच ६ फेब्रुवारी २०२० रोजी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देश व पत्रानुसारच आनुषंगिक काम होणार असल्याचे पालिका प्रशासन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Start preparing a rough outline of the ward structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.