शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:33 IST

खामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.खामगाव मतदार संघातील बहुतांश भाग हा अवर्षण ग्रस्त म्हणून ओळखला जातो. हा डाग पुसून टाकण्यासाठी खामगांव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड आकाश फुंडकर यांनी प्रयत्न सुरु केले. निम्न ज्ञानगंगा प्रकल्प मागील अनेक वषार्पासून रखडला होता. हा प्रकल्प पुर्ण व्हावा हे दिवंगत लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी १६० कोटी रुपये मंजूर करुन घेतले होते. यामाध्यमातून याठिकाणच्या कुटूंबाच्या पुनर्वसनाचा तसेच शेतक-यांच्या जमीनीच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला होता. त्यातून नवीन नियमानुसार हया शेतक-यांना ४ ते ५ पट मोबदला देण्यात आला आहे. हया प्रकल्पामुळे ११८१ हेक्टर म्हणजेच जवळपास ३००० एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यातून २२ ते २५ गावांना याचा फायदा होऊन सिंचनामुळे हजारो शेतकरी कुटूंबाच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थीक उन्नती होणार आहे. मागील तीन ते चार दशकानंतर हा पहिलाच प्रकल्प आहे. जो सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे पुर्णत्वास गेला आहे. लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे हे स्वप्न आज पुर्ण होत असून या प्रकल्पात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. सद्या मतदार संघात दमदार पाऊस झाला असून त्यामुळे हया प्रकल्पात जवळपास १ ते २ कि.मी पर्यंत पाणी साठलेले दिसत आहे. हया धरण क्षेत्रातील मोठ मोठी झाडे आता पाण्याखाली जात आहेत. हया प्रकल्पामुळे परिसरातील जमीनीतील पाणीसाठा वाढणार आहे. खामगांव परिसरात जवळपास तीन ते चार दशकानंतर हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यात आज मोठया प्रमाणात पाणी साठवणुक होऊन संपुर्ण परिसर जलमय होणार आहे. तसेच हयाठिकाणी बुलढाणा रस्त्यावरील जुना पुल लवकरच पाण्याखाली जाणार आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण