शेतकरी शिवार संवाद अभियानास प्रारंभ
By Admin | Updated: May 26, 2017 01:34 IST2017-05-26T01:34:44+5:302017-05-26T01:34:44+5:30
जळगाव जामोद : संपूर्ण राज्यात भाजपाच्यावतीने शेतकरी शिवार संवाद अभियानास गुरूवार, २५ मे पासून सुरुवात करण्यात आली

शेतकरी शिवार संवाद अभियानास प्रारंभ
जळगाव जामोद : संपूर्ण राज्यात भाजपाच्यावतीने शेतकरी शिवार संवाद अभियानास गुरूवार, २५ मे पासून सुरुवात करण्यात आली असून, या अभियानाचे राज्यप्रमुख आ.डॉ. संजय कुटे यांनी तालुक्यातील ग्राम पळसखेड येथे जावून बंधाऱ्यातील गाळ उपसत श्रमदान केले, तसेच बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याबाबत असलेल्या अडचणींचे निराकरण केले.
पळसखेडनंतर वडशिंगी येथे जावून शेतकऱ्यांशी व आम जनतेशी संवाद साधत त्यांच्या समवेत आ.डॉ.संजय कुटे यांनी न्याहारीचा आस्वाद घेतला. संध्याकाळी निवाणा व चांगेफळ या दोन गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाच्या शेतीसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्व योजना समजावून घेत त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आ.डॉ.कुटे यांनी शेतकऱ्यांना केले. प्रथमच कोणी लोकप्रतिनिधी बांधावर येवून शासकीय योजनांची माहिती व शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत असल्याचे चित्र पाहून शेतकऱ्यांना मोठे हायसे वाटले. यावेळी आ.कुटे यांचे प्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी यांनी खेडोपाडी जावून शेतकरी शिवार संवाद अभियानास प्रारंभ केला.