बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्र सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:20 IST2017-10-31T13:20:44+5:302017-10-31T13:20:53+5:30
बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरु करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्र सुरु करा
बुलडाणा : कधीकाळी कॉटन बेल्ट या नावाने ओळखल्या जाणाºया बुलडाणा जिल्हा दरम्यानच्या कालावधीत सोयाबीनकडे वळला. मात्र आजही मोठ्या प्रमाणात घाटाखाली अन् पाठोपाठ घाटावर सुध्दा कापूस पेरा आहे. आज हेच ‘पांढरे सोने’ शेतकºयांच्या घरात आले असले तरी हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यासाठी सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरु करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्फत शासनाला ३० आॅक्टोंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये नमूद आहे की, गत दोन वर्षापूर्वी दुष्काळ आणि गतवर्षी नोटाबंदीमुळे भावमंदिला शेतकºयांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदा कापसाचे उत्पादन चांगले झाले असून शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र सद्या शेतकºयांचा कपूस हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात आहे. जिल्ह्यात एकही कापूस पणन महामंडळ, सीसीआयचे खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकरी आपला कापूस परजिल्ह्यात घेवून जात आहेत. यासाठी पुन्हा आर्थिक झळ पोहचते त्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने सीसीआय खरेदी केंद्र सुरु करावीत अन्यथा शिवसेना आंदोलनाचा मार्ग स्विकारेल, असा इशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधूताई खेडेकर, न.पा.उपाध्यक्ष विजय जायभाये, न.पा.सभापती दीपक सोनुने, उमेश कापुरे, कैलास माळी, किसान सेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, नारायण हेलगे, गजेंद्र दांदडे, राजु मुळे, सचिन परांडे, गजानन पाटील, रमेश बरडे, साहेबराव थोरात, राहुल थोरात, विजय इतवारे, निलेश राठोड, लहु राठोड, संजय तोटे, बाळासाहेब बारोटे, अनिल जगताप, रामदास जगताप, सुरेश जगताप, प्रभाकर तुपकर, गिरीश आडेकर, अमोल बुधवत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.