ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:13 IST2021-09-02T05:13:47+5:302021-09-02T05:13:47+5:30

आंधई शिवारात अस्वलांचा वावर चिखली : आंधई शिवारात अस्वलांचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत. ...

Start bus services in rural areas | ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू करा

ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू करा

आंधई शिवारात अस्वलांचा वावर

चिखली : आंधई शिवारात अस्वलांचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत. शेतांमध्ये काम करण्यास कुणी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील आंधई येथील शेतात दोन दिवसांपूर्वी एक अस्वल आढळून आले. बैलांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या हौदात सायंकाळी साडेचार वाजता एका भल्या मोठ्या अस्वलाने पाणी पिले. त्यानंतर ते शेतशिवारातून निघून गेले. आंधई शिवारात वेळोवेळी अस्वलं आढळून येत आहे.

ग्रामीण भागात वीजचाेरी वाढली

जानेफळ : परिसरातील अनेक गावांत विद्युतवाहिनीवर आकडे टाकून विजेची चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. काही जणांविरुद्ध कारवाई केली जाते, मात्र काही जण अद्यापही हा प्रकार करीत आहेत. याबाबत महावितरणने कठोर पावले उचलून कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Start bus services in rural areas