मुद्रांकशुल्क अनुदान वित्त आयोगाच्या खात्यात
By Admin | Updated: January 28, 2015 23:40 IST2015-01-28T23:40:38+5:302015-01-28T23:40:38+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सागवण ग्रामपंचायतच्या १३ सदस्यांनी केली तक्रार.

मुद्रांकशुल्क अनुदान वित्त आयोगाच्या खात्यात
बुलडाणा : सागवण ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक पी.बी. कानडजे यांनी मुद्रांक शुल्क निधी इतरत्र वळविला. हा निधी तत्काळ परत करावा अशी मागणी उपसरपंच शकुंतला उगले यांच्यासह ग्राम पंचायतीच्या १३ सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, सागवण ग्रामपंचायतीला सन २0१५ या आर्थीक वर्षात मुद्रांक शुल्क निधी सुमारे ३0 लाख रूपये प्राप्त झाले होते. मात्र सदर अनुदानाची रक्कम तत्कालीन ग्रामसेवक पी.बी. कानडजे यांनी १३ व्या वित्त आयोगाच्या खात्यामध्ये वर्ग करून घेतली. ही रक्कम १३ व्या वित्त आयोगाच्या खात्यात कशी वर्ग करण्यात आली याबाबत चौकशी करण्यात यावी. याशिवाय ग्रमसेवक पी.बी.कानडजे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी सागवण ग्रामपंचायतीमध्ये नव्याने रूजू झालेले ग्रामसेवक टेकाळे यांच्याकडे रितसर पुर्ण पदभार सुपूर्द करायवयास हवा होता. मात्र कानडजे यांनी अर्धवट पदभार दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये नव्याने रूजू झालेले ग्रामसेवक टेकाळे यांना मागील जमाखर्च वाचून दाखविता आला नाही. कामकाज प्रोसीडींगमध्ये कोणते ठराव घेतले आहेत त्याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. यासर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.