किनगावजट्ट परिसरात हरिण, रोहीचा हैदोस
By Admin | Updated: October 7, 2015 23:25 IST2015-10-07T23:25:23+5:302015-10-07T23:25:23+5:30
हरिणांच्या कळपांकडून शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान.

किनगावजट्ट परिसरात हरिण, रोहीचा हैदोस
किनगावजट्ट ( जि. बुलडाणा) : किनगावजट्ट परिसरात हरिण व रोहीचा हैदोस वाढला असल्याने, हरिणांचे कळप शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. लोणार तालुक्यातील वसंतनगर, देवानगर, भुमराळा या परिसरात हरिण, रोही या वन्यप्राण्यांचे प्रमाण वाढले असून, हे वन्य प्राणी शेतातील उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान करीत आहेत. अगोदरच अल्प पावसामुळे पिके कसेतरी तग धरुन असून, त्यातच या वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. उडीद व मूग पिकाचा लावलेला लागवडीचा खर्चसुद्धा वसूल झाला नाही. थोड्याफार प्रमाणात कपाशी पीक उभे आहे, तर हे वन्यप्राणी रात्री शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहेत. लागवडीपासून पिकावर देखरेख ठेवावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.