शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मर्दडीच्या घाटात पहाटेच्या सुमारास एसटी बस उलटली; ४ गंभीर, ९ जखमी

By निलेश जोशी | Updated: October 6, 2023 09:52 IST

पहाटेची घटना: जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

नीलेश जोशी

बुलढाणा: मलकापूरवरून आगाराची एसटीबसला बुलढाणा शहरापासून २० किमी अंतरावर मर्दडीच्या घाटात एका वळणावर अपघातग्रस्त होऊन दरीत कोसळी. सुदैवाने झाडामध्ये ती अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील १३ पैकी ४ प्रवाशी गंभीर जखमी असून ९ जण किरकोळ जखमी झाल आहेत. हा अपघात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला.मलकापूर आगारीच एमएच ४०-वाय-५४८१ क्रमांकाची बस ही मलकापूरवरून छत्रपती संभाजीनगरला जात होती. पहाटे ५:५० वाजता बुलढाणा बसस्थानकातून ही बस धाडच्या दिशेने निघाली होती.

दरम्यान बुलढाणा शहरापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मर्दडीच्या घाटातील मुख्य वळणावर ही बस न वळता थेट दरीत घुसल्याची माहिती आहे. या दरम्यान बसने एक पलटी घेतली. मात्र घाटातील सागाच्या झाडांमध्ये अडकल्याने अपघाताची तिव्रता कमी झाली. सोबतच एका झाडाला ही बस धडकून तेथेच अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दुसरीकडे अपघाताच्या पाच मिनीट अगोदरच एसटीच्या तपासणी पथकाने दुधा गावानजीक बसची तपासणी केली होती. हे तपासणी पथकाचे वाहन व एसटीबस पाठोपाठ जात असतांनाच मर्दडीच्या घाटात हा अपघात घडला.

बसचा काच फोटून प्रवाशांना काढले बाहेरअपघातानंतर तपासणी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिकांनी तेथे पोहोचत बसचा समोरील काच फोडून जखमींना बाहेर काढले. या अपघातमुळे बसमधील प्रवाशी चांगलेच भेदरले होते. दैव बलवत्तर म्हणून थोड्यात निभावले अशीच प्रतिक्रिया बसमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसत होती. जखमीमध्ये बसच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे.

जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारअपघातातील जखमींना प्रथमत: धाड व तेथून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजेच्या सुमारास विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे व त्यांचे सहकारी हे जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी पोहोचले होते.

टॅग्स :AccidentअपघातBus Driverबसचालकbuldhanaबुलडाणा