एसटी-दुचाकीची धडक; दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: July 18, 2016 02:35 IST2016-07-18T02:35:32+5:302016-07-18T02:35:32+5:30

धाड-औरंगाबाद रस्त्यावर जांब गावाजवळ अपघात.

ST-Bike Strike; Biker killed | एसटी-दुचाकीची धडक; दुचाकीस्वार ठार

एसटी-दुचाकीची धडक; दुचाकीस्वार ठार

धाड (जि. बुलडाणा): धाड-औरंगाबाद रस्त्यावर जांब गावाजवळील पुलावर एसटी बस व विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली.
बुलडाणा तालुक्यातील तांदूळवाडी येथील रहिवासी असलेले विजय संपत खरे (वय २८) हे आपल्या एमएच २८ एस २६७३ या दुचाकीने धाडवरून औरंगाबाद येथे जात असताना जांब गावाजवळील पुलावर नाशिक डेपोची बस क्र.१४ बीटी ४0७९ नाशिक-बुलडाणा या बसवर दुचाकीस्वार आदळले. यामध्ये विजय संपत खरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला हेल्मेट बांधलेले होते, त्यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास ठाणेदार एल.डी. सोद्मो, पोकॉ माळी, राजपूत, परमार, महिला पोलीस शेळके करीत आहेत. सध्या पावसाळा सुरू असून, औरंगाबाद रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे.

Web Title: ST-Bike Strike; Biker killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.