देऊळगाव राजा शहरात फवारणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:37 IST2021-04-28T04:37:36+5:302021-04-28T04:37:36+5:30

देऊळगाव राजा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ तसेच डासांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात ...

Spray in Deulgaon Raja city | देऊळगाव राजा शहरात फवारणी करा

देऊळगाव राजा शहरात फवारणी करा

देऊळगाव राजा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ तसेच डासांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे़ त्यामुळे, नगर पालिका प्रशासनाने शहरात जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी युवकांनी नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़

देऊळगाव राजा शहर व परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे.त्यातच शहरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता नागरिकात भितिचे प्रमाण वाढले आहे.डासांमुळे साथिचे रोग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे़ त्याकरिता ऩ प़ प्रशासनाने वेळीच शहरात जंतू नाशक फवारणी करण्याची मागणी शहरातील युवक वर्गाने केली़ याविषयी युवकांनी नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे़ निवेदनावर

बंटी सूनगत ,गौरव रायमूल ,विनायक कांबळे,ऋषिकेश शेजुळकर ,राजेश सपाटे, रोहित बांगर,राम वाघमारे,अनिकेत कांबळे,अनिकेत फुलझाडे,शुभम बोन्द्रे, रवी रेनाकाळे, मंगेश शेळके आदिची उपस्थिती होती.

Web Title: Spray in Deulgaon Raja city