अधिका-यांनी सोडविल्या ‘ऑन दि स्पॉट समस्या
By Admin | Updated: July 15, 2015 00:54 IST2015-07-15T00:54:11+5:302015-07-15T00:54:11+5:30
महावितरणचे जनसंपर्क अभियान; शेगावपासून झाला प्रारंभ.

अधिका-यांनी सोडविल्या ‘ऑन दि स्पॉट समस्या
शेगाव (जि. बुलडाणा) : शासनाच्या अनेक योजना गावापयर्ंत पोचविण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसते. त्याला फाटा देत महावितरणने तालुका स्तरावर पोहचत त्या भागातील अधिकार्यांना एकत्रित घेऊन जन संपर्क अभियान राबविण्याचा भरविण्याची नवीन संकल्पना हाती घेतली असून या अंतर्गत मंगळवारी शेगाव येथे आयोजीत जन संपर्क अभियानात अनेक वर्षे महिन्यापासून असलेल्या नागरिकांच्या समस्या ह्यऑन दि स्पॉट निकाली काढल्या. शासनाने महावितरण कंपनी अंतर्गत नागरिकांसाठी दिलेल्या अनेक योजना गावापयर्ंत पोहचत नाही त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात शिवाय अनेक ग्राहकांच्या समस्या असतात. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न म्हणून महावितरणाचे जन संपर्क अभियान सुरु झाले आहे. यामध्ये मंगळवारी महावितरण कंपनी चे अधीक्षक अभियंता के.एस.शेगोकार, खामगाव चे कार्यकारी अभियंता एस.एन राठोड, उप कार्यकारी अभियंता हर्षितकुमार वाकोडे, कनिष्ठ अभियंता चौधरी यांनी शेगाव कार्यालयात शहर व तालुक्यातील विज ग्राहकांना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधला शिवाय महावितरणाच्या विविध योजना समजावून सांगितल्या. यावेळी मनसगाव येथील शेतकर्यांनी आपल्या कृषिपंपांना योग्य दाब नसल्याने शेती करणे अवघड झाल्याची बाब अधीक्षक अभियंता के.एस.शेगोकार यांच्या लक्षात आणून दिल्या नंतर सदर कामाबाबत त्यांनी लगेच आदेश दिले. या शिवाय अनेक समस्याही निकाली काढण्यात आल्या. या कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील विज ग्राहक आणी नागरिक उपस्थित होते.